नमाद महाविद्यालयात विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

106

गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल कला वाणिज्य महाविद्यालयात पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडून येतो. महाविध्यालायत आयोजित स्पर्धा परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांचे सहभागी होणे म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणे होय. हे जाणून पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाद्वारे विविध उपक्रमाचे आयोजन केल्या जाते. समाज माध्यमाची चलती असल्याच्या काळात फेसबूक, व्हाट्सअँपवर येणाऱ्या माहितीची शहानिशा करता तिलाच सत्य मानल्या जात असल्याने या अनेक महापुरुषांच्या कार्य आणि चरित्रावर शिंतोडे उडविले जात आहे. महापुरुषांची माहिती व्हावी आणि त्यांच्या कार्याची ओळख व्हावी या उदात्त हेतूने सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता आणि त्या पुढील आव्हाने या विषयावर निंबध स्पर्धा घेण्यात आली. या परीक्षेत अभय पटले याने प्रथम क्रमांक पटकाविला. आदित्य बरमाटे द्वितीय तर अंजली धुर्वे हिने तृतीय क्रमांक मिळविला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त 2 ऑक्टोबरला गांधीजींच्या जीवनावर प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत रंजू सोमवंशी ही प्रथम तर गौरी भेलावे ही द्वितीय पुरस्काराची मानकरी ठरली. प्राचार्या डॉ. शारदा महाजन व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अर्चना जैन यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. किशोर वासनिक, डॉ. शशिकांत चौरे व प्रा. घनशाम गेडेकर उपस्थित होते.