कुनघाडा रै. येथे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

1313

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कुुनघाडा रै. येथे डीपीडीसी जनसुविधा शीर्षकाखाली माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या स्थानिक निधीतून मंजूर झालेल्या सिमेंट – काँक्रेट रस्ता कामाचे भूमिपूजन १४ सप्टेंबर रोजी माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रभाकर वासेकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, माजी सरपंच अशोक वासेकर, ग्रा. पं. सदस्य दिलीप दुधे, पांडुरंग टिकले, गुलाब मानापुरे, अतुल भांडेकर, लालाजी सातपुते, विठ्ठल दुधबळे, जीवनदास नैताम, दिवाकर कोठारे, संदीप काटवे, संतोष गव्हारे, सतीश सातपुते, रमेश कोठारे, अक्षय सुरजागडे, रिंगनाथ चापडे, शामराव कुनघाडकर, श्रीकृष्ण नैताम, अमोल देवगीरकर, विपुल कोडाप, रमेश गव्हारे, दीपक भांडेकर,मोरेश्वर कुनघाडकर, लोकेश सातपुते, रमेश कुनघाडकर, प्रभाकर कुकडे, विनोद सातपुते, विजय श्रीकोंडावार, उमेश गझलपल्लीवार, प्रभाकर चापडे, होमदेव चापडे, पंकज निमगडे व गावकरी उपस्थित होते.