विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली व द युनिक अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) क्रॅश कोर्स योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांकरिता विनामूल्य शिकवणी वर्गाचे उद्घाटन शुक्रवार, २२ मे रोजी येथील सेमाना बायपास रोडवरील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत पार पाडले.
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षा विषयी मोलाचे मार्गदर्शन व आपले अनुभव कथन केले.भावी शिक्षकांनी पुढील ३० दिवस जिद्दीने मेहनत करून आगामी टीईटी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून द युनिक अकॅडमी पुणे येथील मार्गदर्शक संतोष श्रीवास्तव, आदिवासी विकास निरीक्षक रवी आत्राम, मुख्याध्यापिका वंदना महल्ले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सविता शेंडे यांनी केले. अधीक्षक देविदास चोपडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.







