सर्वसामान्यांचे हीत जपणारा अर्थसंकल्प : धर्मरावबाबा आत्राम

1413

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्र, नवीन वैद्यकीय महाविद्यालय, नव्याने आयआयटी व आयआयएमची स्थापना, महिलांकरीता निःशुल्क कॅन्सर लसीकरण, १ कोटी घरांना सौर उपकरणांचे वितरण, १ कोटी गरीबांना ३०० युनिट पर्यंत मोफत वीज, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकरीता योजना, गरिबांसाठी २ कोटी घरे, तीन कोटी महिलांना लखपती दीदी योजना, आशा वर्कर्सला आयुष्यमान योजनेचा लाभ, रेल्वे प्रवास सुखकर, कृषी क्षेत्रात पीपीपी मॉडेल आणणार, नैनो युरीया नंतर नैनो डीएपी खत वापरण्यावर भर, आदी अनेक सुधारणा या अर्थ संकल्पात दिसत आहे. पायाभूत सुविधा मजबूत करण्यावरही भर देण्यात आला असल्याने हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचे हीत जपणारा आहे.