टीव्ही रिअ‍ॅलिटी शोच्या विजेत्यांचा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

1018

– भावी आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा

– जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

गडचिरोली : शहरातील मनीषा जगदीश मडावी यांनी Runway walk title of india TV Reality show २०२२ हा किताब जिंकून देशपातळीवर गडचिरोली जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा रोवल्या गेला.
३० जानेवारी रोजी पुणे येथील WE हॉटेल येथे Runway walk title of india TV Reality show२०२२ घेण्यात आला. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातून मनीषा जगदीश मडावी, कृष्णा वासुदेव तडसे, काव्या खुमेंद्र मेश्राम, आर्या नरेश बिडकर, अनुष्का नरेश बिडकर, सिद्धेश खुशाल मुनघाटे, यशश्री विनोद वंजारी, आरुष उत्तमराव मेहेरे यांनी ऑडिशन देऊन थेट ग्रॅण्ड फिनालेमध्ये पोहचत वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये यशस्वीरित्या विजय संपादन करून गडचिरोली जिल्ह्याचे नाव देशपातळीवर रियालिटी नॅशनल टीव्ही शोच्या माध्यमाने पोचविले.आज माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते या सर्वांचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी नगराध्यक्ष यांनी सर्वांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम, जगदीश मडावी, खुमेंद्र मेश्राम, अन्नपूर्णा मेश्राम, वासुदेव तडसे, बबिता तडसे उपस्थित होते.