Home गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाच्या कामात संथगती ; प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात आज ‘रस्ता रोको’ आंदोलन

राष्ट्रीय महामार्गाच्या कामात संथगती ; प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात आज ‘रस्ता रोको’ आंदोलन

8

– कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची संतोष ताटीकोंडावार यांची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागील सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या NH 353 C या राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामामुळे नागरिक आणि वाहनधारकांना जगणे कठीण झाले आहे. मात्र प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वारंवार निवेदने देऊनही कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग ठोस कारवाई करीत असल्याने आज २९ एप्रिल २०२६ रोजी मौजा मोसम येथील संड्रा फाटा येथे तीव्र रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष संतोष रामचंद्र ताटीकोंडावार यांनी दिली आहे.

NH 353 C या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाचे कंत्राट सन २०२१ मध्ये वैशिष्ट्य कंपनी, व्ही.एम. म्हात्रे कंपनी आणि ए.सी. शेख कंपनीला देण्यात आले होते. मात्र सहा वर्षांचा कालावधी लोटूनही केवळ १६ कि.मी. रस्ता पूर्ण होऊ शकलेला नाही. या विलंबाबाबत कंत्राट रद्द करून संबंधित कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे आणि त्यांच्याकडून ५ पट दंड वसूल करावा या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलनाचा पवित्रा उचलण्यात आला आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी संघटना, विविध संघटना, प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी, कष्टकरी यांनी या रस्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केले आहे.

error: Content is protected !!