Home गडचिरोली आदिवासींच्या विकासाबरोबरच पक्षीय संघटन बळकटीकरणावर विशेष भर

आदिवासींच्या विकासाबरोबरच पक्षीय संघटन बळकटीकरणावर विशेष भर

24

– भाजप आदिवासी मोर्चाचा पत्र परिषदेत निर्धार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच पक्षीय संघटन बळकटीकरणावर विशेष भर देण्याचा निर्धार राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी भारतीय जनता पक्ष आदिवासी मोर्चाच्या वतीने गडचिरोली येथील सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

या पत्रकार परिषदेला भाजप आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार डॉ. देवराव होळी, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आपल्या मार्गदर्शनात आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आगामी कार्यक्रम, प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आदिवासी समाजाशी थेट संवाद वाढवून पक्षीय संघटन मजबूत करण्यावर आणि शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर उपस्थित मान्यवरांनी भर दिला. या पत्रकार परिषदेतून आदिवासी भागात पक्षाची संघटन वाढ आणि जनसंपर्क अधिक प्रभावी करण्याचा स्पष्ट निर्धार व्यक्त करण्यात आला.

error: Content is protected !!