राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडचिरोली शहर अध्यक्षपदी विजय गोरडवार यांची नियुक्ती

118

– आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात व आदेशानुसार राकाँ जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी गडचिरोली नगर परिषदेचे माजी सभापती विजय गोरडवार यांची नियुक्ती केली आहे.
गोरडवार यांनी आपल्या नियुक्तीचे श्रैय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार धर्मरावबाबा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यात येईल आणि पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही गोरडवार यांनी नियुक्तीप्रसंगी बोलून दाखविली.

या नियुक्तीबद्दल विजय गोरडवार यांचे राकाँ कार्यकर्ते नईमभाई शेख,माजी नगरसेविका संध्याताई उईके, माजी नगरसेविका मिनलताई चिमूरकर, निताताई बोबाटे, मनोज मोहुर्ले, भास्कर निमजे, अमोल कुळमेथे, अमर खंडाळे, प्रसाद पवार, अजय कुकडकर, नितीन पिपरे, मोरेश्वर मानपल्लीवार, प्रभू रोहनकर, अनिल निकुरे, सुधीर आखाडे, रेखा कोराम, आरती कोल्हे, अमोल दासरवार, सदाशिव नैताम, गुरु भांडेकर आदींनी अभिनंदन केले.