Home गडचिरोली काँग्रेस कमिटीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी ॲड. विश्वजित कोवासे

काँग्रेस कमिटीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी ॲड. विश्वजित कोवासे

9

– नियुक्तीबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांचे मानले मनःपूर्वक आभार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : संघटन सृजन अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील तळागाळातील जनसामान्यांचा तसेच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भावना, इच्छा आणि आकांक्षा यांचा सखोल आढावा घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी ॲड. विश्वजित मारोतराव कोवासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण जबाबदारीबद्दल ॲड. कोवासे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

ही जबाबदारी सोपविल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे महासचिव के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनिथल्ला, भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी मनीष शर्मा, भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सचिव मुकुल वासनिक, अविनाश पांडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रभारी कुणाल चौधरी, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी खासदार मारोतराव कोवासे, आमदार रामदास मसराम, आमदार सुधाकर अडबले, आमदार अभिजीत वंजारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव रविंद्र दरेकर, महासचिव अजय कंकडालवार, सचिव पंकज गुड्डेवार, जिल्हा परिषदचे माजी सदस्य ॲड. रामभाऊ मेश्राम, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट, ललित बरछा, माजी तालुकाध्यक्ष मनोज वनमाळी, परसराम टिकले यांच्यासह सर्व मान्यवर नेतेमंडळींचे ॲड.विश्वजित कोवासे यांनी विशेष आभार मानले.

ॲड. विश्वजित कोवासे यांची गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोडघरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, देवाजी सोनटक्के, घोटेकर, काशिनाथ भडके, नंदू वाईलकर, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेवक पराग पोरेड्डीवार, नगरसेवक नंदू कायरकर, नगरसेविका मनीषा खेवले, नगरसेविका मेघा वरगंटीवार, अब्दुलभाई पंजवानी, नरेंद्र डोंगरे, सौरभ म्हशाखेत्री, भूपेश कोलते, माधवराव गावळ, दत्तात्रय खरवडे, राजू गारुदे, आरीफ कनोजे, पी. आर. आखरे, नवनाथ धाबेकर, नादिर भामानी, हेमंत मोहितकर, श्रीनिवास आंबटवार यांच्यासह सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक काँग्रेस, NSUI, महिला काँग्रेस व सर्व फ्रंटलचे सेल अध्यक्ष, मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!