मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर सेवा पंधरवडा साजरा करणार : आमदार डॉ. देवरावजी होळी

141

– मोदीजींच्या जीवनावरील प्रदर्शनी, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, बुद्धिजीवी संमेलन, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, मेळावे, यासह विविध कार्यक्रमांचे या पंधरवड्यामध्ये आयोजन

– सेवा पंधरवडामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आमदार महोदयांचे आवाहन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारताचे यशस्वी, लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचा १७ सप्टेंबरला वाढदिवस असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा कालावधी सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येत असून गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये या निमित्ताने विविध कार्यक्रमांंचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली आहे.

भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी कार्य करीत आहे. मा. मोदीजी देशातील गोर-गरीब, शोषित, वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे ध्येय साध्य करत विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.

मा. मोदीजींचा वाढदिवस १७ सप्टेंबर असून २ ऑक्टोबरला महात्माजी गांधी यांची जयंती आहे. हा पंधरा दिवसांचा कालावधी सेवा पंधरवाडा म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, महामंत्री प्रमोदजी पिपरे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, आदिवासी आघाडीचे प्रदेश महामंत्री प्रकाशजी गेडाम, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकरराव भांडेकर, गीताताई हिंगे, न. प. चे माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, माजी सभापती मारोतराव इचोडकर, माजी उपसभापती विलासजी दशमुखे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लताताई लाटकर, निमाताई उंदीरवाडे, आदिवासी आघाडीच्या जिल्हा महामंत्री वर्षाताई शडमाके, माजी नगरसेवक केशवजी निंबोड, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविताताई उरकुडे, विमुक्त भटक्या जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी मांडवगडे, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सागरजी कुंभरे, महामंत्री हर्षल गेडाम, राजू शेरकी, गोवर्धनजी चव्हाण, भाजपा शहर महामंत्री विनोद देवोजवार यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या काळात गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या वतीने मोदीजींच्या जीवनावरील प्रदर्शनी, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, बुद्धिजीवी संमेलन, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, मेळावे यासह विविध कार्यक्रमांचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच जनतेने सहभागी होऊन यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.