विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आलापल्ली येथील व्यापारी संघटनेच्या विविध समस्या संदर्भात प्रश्न निकाली लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. आलापल्ली येथे दोन – तीन दिवस चाललेल्या व्यापारी संघटनेच्या आंदोलनासंदर्भात १६ सप्टेंबर २०२२ ला खासदार अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने, तसेच आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या सहकार्याने व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, सुरजागड प्रकल्पाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आर.टी.ओ यांच्या प्रमुख उपस्थितीत व सहमतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करुन व्यापाऱ्यांच्या समस्येबाबत आढावा घेतला.
व्यापारी संबंधित प्रमुख समस्या
बायपास रस्ता ३ महिण्यात तयार करावा, बायपास रस्ता तयार होईपर्यंत सुरजागड येथील ट्रक रात्री १०.०० ते सकाळी ५.०० पर्यंतच सुरू ठेवावे (येणे जाणे दोन्ही फक्त रात्री सुरू ठेवावे.), सर्व गाडया क्षमतेनुसार भरावे (अंडरलोड), सुरजागड पहाडावरील उत्खनन केलेले लोहयुक्त दगडचुरा जडवाहनाने वाहतुक करून एटापल्ली ते आलापल्ली वाहतूक होत असल्याने जनतेला होणाऱ्या त्रासाचे, समस्याचे निराकरण करण्यात यावे आदींचा समावेेश आहे.
आलापल्ली रोडवर मोठेमोठे खड्डे पडलेले आहेत. यात सर्व लोड वाहनांंचे व्यापारांच्या दुकानात उडतो. त्यामुळे दुकानाचे अतोनात नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी आलापल्ली ते चंद्रपूर मेन रोड राज्य महामार्गाचा उपयोग करावा लागतो. या मार्गावर जाणे – येणे करिता जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतो. या व्यापाऱ्यांच्या प्रमुख समस्या व मागण्यासह जिल्हाधिकारी यांनी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक विचार मांडले. नॅशनल हायवे रोड लवकरात लवकर तयार करण्यात येईल. तसेच बायपास रोड करण्यासंबंधी यावेळेस सकारात्मक विचारसुद्धा मांडण्यात आले.
गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त असल्याने याप्रसंगी जिल्हाधिकारी संजय मीणा बोलताना म्हणाले की, दिवसा जर गाड्या (ट्रक) बंद केले तर रात्रीच्या वेळेस अपघात होण्याचे प्रमाण जास्त वाढेल. रात्रीच्या वेळेस सुरक्षेसंबंधी अडचणी निर्माण होतील. ट्रक वाहनाची स्पीड (४०) चाळीस केली जाईल. ट्रक वाहनासाठी पार्किंगची सुद्धा व्यवस्था केली जाईल. ट्रक वाहनाचे लोड करताना वाहनातील भरलेल्या मालावर व्यवस्थित ताडपत्री झाकूनच लोड केल्या जाईल. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न उपस्थित केल्यानंतर सकाळी आठ ते दहा व तीन ते पाच या कालावधीच्या दरम्यान एकतर्फी गाडी चालवण्यात येईल. अशा पद्धतीने जिल्हाधिकारी (कलेक्टर) यांनी खा. अशोकजी नेते, आम. धर्मरावबाबा आत्राम यांच्या सहमतीने व सहकार्याने व्यापारी संघटनेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सुरजागड प्रकल्पाचे अधिकारी व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी संबंधित चर्चा करून तोडगा काढण्यासाठी सकारात्मक विचार मांडला.
याप्रसंगी खासदार अशोकजी नेते, गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, आरटीओ चव्हाण साहेब, त्रिवेणी संचालक सुरजागड व्यंकटेश्वरजी, संघटन जिल्हा महामंत्री रविंद्रजी ओल्लालवार, प्रदेश सदस्य स्वप्निलजी वरघंटे, विनोद आकनपल्लीवार, सागर डेकाटे, सरपंच शंकर मेश्राम, आशिष पिपरे नगरसेवक, पंकज लाडवे, रमेश अधिकारी, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, चंद्रकिशोर पांडे, राकेश गण्यारपवार, अमोल कुलपकवार तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.