कारवाफा आश्रमशाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

29

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा येथे ६५ वा महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

ध्वजारोहण मुख्याध्यापक विष्णू चव्हाण यांच्या हस्ते झाले. ध्वजसंचालन माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले. मानवंदना क्रीडा शिक्षक अभय कांबळे यांनी दिली.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गजानन वड्डे, उच्च माध्यमिक शिक्षक एम. ई. ठाकूर, टी. ए. आस्कर, पद्मावती महेशगौरी, सी. डी. नळे, माध्यमिक शिक्षक व्ही. एस. देसू, वर्षा मस्के, प्राथमिक शिक्षक व्ही. एम. नैताम, रविकांत पिपरे, आय. एम. कुमरे, कविता बारसागडे, अधीक्षक जी. एस. सानप, अधीक्षिका पुष्पा चव्हाण, करिश्मा गोवर्धन, सुनिता दुर्कीवार, संगीता करंगामी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, नागरिक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रमानंतर इयत्ता १ ते ९ व ११ वीचा वार्षिक परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला.