विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शहरातील कारगील चौक येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते नंदुभाऊ कुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक सुनील देशमुख, रेवनाथ गोवर्धन, रुपेश सलामे, ग्रामगीताचार्य तुषार निकुरे, राजीव गांधी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा मडावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना साक्षरतेची शपथ देण्यात आली. देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाचे महत्त्व याबाबत संदेश देत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.







