अजय कंकडालवार व डॉ. नामदेवराव किरसान यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्याला दिली भेट

40

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिराेली : तेलंगाणा राज्यात दोन बळी घेऊन परत आलेल्या रानटी हत्तीने अहेरी तालुक्यातील कोरेली येथील दस्सा कोहला मडावी या शेतकऱ्याच्या घराचा नुकसान केल्याने आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा समन्वयक व माजी जि. प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार व काँग्रेस नेते डॉ. नामदेवराव किरसान यांनी अतिदुर्गम कोरेली येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्याची भेट घेऊन अस्थेने विचारपूस केली.

६ एप्रिल रोजी तेलंगणा राज्यातून प्राणहिता नदी ओलांडून भामरागड तालुक्यात गेलेल्या रानटी हत्तीने रेपणपल्ली वनपरिक्षेत्रात तब्बल १८ दिवस मुक्काम ठोकून बाहेर पडताच अहेरी तालुक्यातील चिरेपल्ली, कोत्तागुडम, ताडगूडा, कोरेलीसह आदी गावात पिकांसह घरांचेही नुकसान केले. त्यानंतर सदर रानटी हत्ती भामरागड तालुक्यात दाखल झाले. या दरम्यान त्या रानटी हत्तीने या भागातील नागरिकांचा अतोनात नुकसान केले.

रानटी हत्तीने २४ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास आरेंदा जंगलातून पेरमेली गावातील तलावाजवळून कोरेली जंगलात प्रवेश केला. येथील शेतातील घरावर हत्तीने हल्ला करून पाडले. त्या घरात ७५ वर्षाची आजारी म्हातारी झोपून होती. सुरुवातीला हत्तीने म्हातारी झोपून असलेल्या घरावर हल्ला केला. त्यानंतर बाहेर झोपलेल्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी वेळीच गावाकडे धाव घेतल्याने ते सुदैवाने बचावले. दरम्यान कवेलूचे छत मातारीचा अंगावर कोसळले. ती म्हातारी रात्रभर तिथेच बसून होती. काही वेळाने गावातील नागरिकांनी धाव घेऊन म्हातारीला बाहेर काढले. मात्र तेंव्हापर्यंत रानटी हत्तीने घराचे छत, कवेलू, साहित्य, भांडी, मोहा, धानाची नासधूस केली.

या घटनेची माहिती मिळताच माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार व काँग्रेस नेते डॉ. नामदेवराव किरसान यांनी कोरली गाव गाठून नुकसानग्रस्त शेतकऱ्याची भेट घेऊन आस्थेने संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेत शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी, अहेरी काँग्रेस तालुका अध्यक्ष निसार ( पप्पू ) हकीम, भामरागड तालुका काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मीकांत भोगांमी, अनु. जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, अहेरी नगरपंचायत नगरसेवक अहेरी प्रशांत गोडसेलवार, माजी उपसरपंच मरपल्ली कार्तिक तोगम, माजी सरपंच वेलगूर अशोक येलमुले, अज्जू पठाण, चंद्रकांत बेजलवार, दिनेश मडावी, सतीश मडावी, सचिन पांचार्या यांच्यासह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.