आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा निलंगा विधानसभा क्षेत्रात प्रचार कार्य जोमात

33

– निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची घेतली भेट

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा शाल, श्रीफळ देऊन केला सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : लातूर लोकसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार सुधाकरजी शृंगारे यांच्या प्रचाराकरिता प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या आदेशानुसार आमदार डॉ. देवरावजी होळी निलंगा विधानसभा क्षेत्रात निरीक्षक म्हणून पूर्णवेळ उपस्थित आहेत.

या प्रचारादरम्यान बुधवारी सकाळी त्यांनी निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी निवडणुक विषयावर त्यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी संभाजी पाटील निलंगेकर यांनी सपरिवार आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.