6 मे राेजी 100 गरजू विद्यार्थ्यांना करणार सायकलचे वितरण

54

– मैत्री परिवार व मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टंसी लिमिटेडचा उपक्रम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिराेली : मैत्री परिवार व मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टंसी लिमिटेडच्या माध्यमातून 6 मे 2024 राेजी अभिनव लॉन गडचिरोली येथे गडचिरोली जिल्ह्यातील 100 गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण करणार आहेत. याकरिता नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

मैत्री परिवार गडचिरोली जिल्ह्यात भव्य विवाह सोहळा, आदिवासी दुर्गम भागात दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे वितरण, आदिवासी विद्यार्थ्याचे पालकत्व स्वीकारणे, शिक्षण, वैद्यकीय सेवा अश्या अनेक सामाजिक कार्यात गडचिरोली जिल्ह्यातील अग्रेसर सामाजिक संस्था अशी ओळख निर्माण करणारी तसेच सामाजिक दायित्व पूर्ण करणारी संस्थाचे रुपात ओळख निर्माण झाली आहे.
यात परत गरजु विद्यार्थांना शैक्षणिक उपक्रमात दळणवळणाची सोय व्हावी म्हणून सायकल स्वरुपात एक मदतीचा हात पुढे केला आहे.

या कार्यक्रमात प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यचे जिल्हाधिकारी संजय दैने, पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच मनोज बंड, अमरस्वरुप फाउंडेशनचे अध्यक्ष, निरंजन वासेकर, मैत्री परिवाराचे गडचिरोली अध्यक्ष कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

याकरिता नियोजनची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी निरंजन वासेकर, दिलीप गडपल्लिवार, अविनाश चडगुलवार, डॉ. अमित साळवे, अनिल तिडके, संदीप बैस, अश्र्विनी भांडेकर, प्रा. राकेश चडगुलवार उप्पलवार, डॉ. शंकदरवार यांची उपस्थिती होती.