गडचिरोली ते मुल सेक्शन NH-930 मार्गावरील वैनगंगा नदीवरील वाहतूकीकरिता पर्यायी मार्गाचा वापर

81

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली ते मुल सेक्शन NH-930 मार्गावरील वैनगंगा नदीवरील मोठया पुलाच्या Bearing ची तपासणी व दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याकरिता एक महिण्याचा कालावधी लागणार असून दिनांक 20 डिसेंबर 2021 ते 19 जानेवारी 2022 या कालावधीत light vehicles ची वाहतूक दररोज 4 तास बंद करणे व जड वाहनांची वाहतुक पर्यायी मार्गानी (गडचिरोली-चामोर्शी-मुल रोड मार्गानी) वळविण्यास कळविले आहे.
त्याअनुषंगाने जड वाहनांची वाहतूक जसे ट्रक/बस इत्यादी दिनांक 24 डिसेंबर 2021 ते 21 जानेवारी 2022 पर्यतच्या कालावधीकरीता पर्यायी मार्ग म्हणून गडचिरोली-चामोर्शी-मुल रोड या मार्गाचा वापर करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
तसेच light vehicles जसे Car/ Jeep/ Ambulance इत्यांदी वाहतूक दिनांक 24 डिसेंबर 2021 ते 21 जानेवारी 2022 पर्यत सकाळी 6 वाजेपासून ते सकाळी 10 वाजेपर्यतच्या कालावधी करीता बंद ठेवण्यात येऊन उर्वरीत कालावधीकरीता सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.