तेली समाजाचे एकत्रीकरण ही काळाची गरज : महाराष्ट्र प्रांतिक महासभा कोषाध्यक्ष गजानन शेलार

156

– श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज रथयात्रा व समाज जोडो तथा ओबीसी जागरण अभियान

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : तेली समाज हा संख्येने मोठा आहे. त्यासाठी तेली समाज बांधव सुद्धा मोठा झाला पाहिजे. श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या दर्शनाच्या माध्यमातून संपूर्ण तेली समाज बांधवाचे दर्शन होत असते. तेली समाजाला जोडायाचे असेल तर तेली सामाजाचे एकत्रीकरण महत्वाचे आहे. राजकारणामध्ये तेली समाजाने तेली समाजालाच पाठींबा दिला पाहिजे, तेव्हाच राजकारणात तेली समाज मोठा होवू शकतो. आजही संपूर्ण तेली समाज बांधवांचे एकत्रीकरण होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कोषाध्यक्ष गजाननजी शेलार यांनी केले.
श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची रथयात्रा ही संत जगनाडे महाराज यांचा जन्मगाव सौदुंबर येथून निघालेली असून काल गडचिरोली येथे रथयात्रेचे आगमन झाले. आठवडी बाजारातील हनुमान मंदिर येथे श्री संत जगनाडे महाराज यांच्या चरणपादुकांचे पूजन करून शहरातील मुख्य बाजार मार्गाने रथयात्रा काढून इंदिरा गांधी चौकातील राजीव भवन येथे समारोप करण्यात आला. यावेळी तेली समाज बांधवांना प्रबोधान्त्मक मार्गदर्शन करताना गजाननजी शेलार बोलत होते.
श्री संथ शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेचे व चरणपादुकांचे शहरातील तसेच संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील हजोरो तेली समाज बांधवांनी दर्शन घेतले.
विदर्भामध्ये एकूण ८० लक्ष तेली समाज आहे. समाजाचा विकास हाच तेली समाज बांधवांनी दृष्टिकोन ठेवला पाहिजे. एक तेली सामाज म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाने तेली समाजाची किंमत केली पाहिजे. तेली समाज बांधवांनी एकमेकांसाठी तेली समाजाची ताकत उभी केली पाहिजे. केन्द्र व राज्य सरकारकडे ओबीसी समाजाच्या जनगणनेची मागणी घेवुन जाणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे महासचिव भूषणजी कर्डिले यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.
यावेळी प्रांतिक तैलिक महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा समन्वयक सुनील चौधरी, समन्वयक नरेन्द्र चौधरी, युवा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष जगदीश वैद्य, नागपूर जिल्हाध्यक्ष दिनेश तिमांडे, नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष (उत्तर) प्रमोदजी पिपरे, जिल्हाध्यक्ष (दक्षिण) प्रभाकरजी वासेकर, विदर्भ तेली समाज जिल्हाध्यक्ष सुरेशजी भांडेकर, उपाध्यक्ष गोपीनाथजी चांदेवार, न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, न. प. सभापती मुक्तेश्वर काटवे, शंकरजी नैताम, भैयाजी सोमनकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शीलाताई सोमनकर, सचिव रोशनी राखडे, उपाध्यक्ष ऐश्वर्या लाकडे, कार्याध्यक्ष अश्विनी भरडकर, नगरसेविका वैष्णवी नैताम, सामाजिक कार्यकर्ते विलास नैताम तसेच जिल्ह्यातील मोठ्या संख्येने तेली समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन रमेशजी भुरसे यांनी केले तर आभार संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष देवानंदजी कांबडी यांनी मानले.