क्रीडा क्षेत्रात करीयर करण्याचा प्रयत्न करा : डॉ. नामदेवराव उसेंडी

138

– लखमापूर बोरी येथे भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे माजी आमदार तथा काँ. कमिटी प्रदेश महासचिव डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : खेळाच्या माध्यमातून व्यक्तीमत्वाचा विकास होतो. सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी खेळ नेहमी खेळावे, युवकांनी काही वेळ खेळण्याकरिता दिला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये क्रिकेट खेळाप्रती अत्यंत आवड दिसते आहे. स्पर्धा शांततेत व शिस्तीत पार पडल्या पाहिजे, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी. उपस्थित चमुंना पुढील सामन्याकरिताा शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर खेळाच्या माध्यमातून करियरचा मार्ग शोधा, असे आवाहन माजी आमदार तथा काँ. कमिटी प्रदेश महासचिव डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी केले आहे.

युवा क्रिकेट क्लब लखमापूर बोरी यांच्या सौजन्याने बोरी येथे आज दिनांक २६ डिसेंबरला भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रीडा स्पर्धेसाठी पहिला, दुसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. उपाध्यक्ष डॉ. टी. एम. दुधबळे, ग्रा. पं. उपसरपंच विनोद भोयर, धनराज पा. कुनघाडकर, ग्रा. पं. सदस्य भाग्यवान पिपरे, प्रकाश सातपुते, ग्रा. पं. सदस्य अरुण सुरजागडे, पंढरी बारसागडे, उंदरूजी बारसागडे, आत्माराम बारसागडे, नरेंद्र, बारसागडे, गुरुदेव बारसागडे, युवा क्रिकेट क्लबचे अध्यक्ष गणेश बारसागडे, उपाध्यक्ष उमाकांत वैरागडे, सचिव जगदीश कोहळे, सहसचिव निखिल वैरागडे, निकेश बारसागडे, निकेश वासेकर, शुभम बारसागडे, शिवम कुनघाडकर, संकल्प बारसागडे आदी बहुसंख्य गावकरी मंडळी व स्पर्धेत भाग घेतलेले रामसागर, व्याहाड येथील खेळाडू उपस्थित होते.