संतांचे विचार अंगीकारून समाजाचा विकास साधावा : माजी जि. प. अध्यक्ष योगिताताई भांडेकर

252

– वालसरा येथे श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ९ डिसेंबर २०२२ : संत शिरोमणी जगनाडे महाराज (sant jagnade maharaj) हे तेली समाजातील (teli samaj) एक मोठे समाज सुधारक व समाजासाठी कार्य करणारे महान संत होऊन गेले. त्यांच्या कार्य विचारांचा प्रसार व प्रचार करण्याची समाजाला आज गरज असून त्यांचे कार्य सर्व तेली समाजापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. संतांंचे कार्य व विचारांमुळे आपणाला जीवनात समोर जाऊन यशस्वी होण्याचा मार्ग मिळतो आपल्याला मिळालेले ज्ञान व साहित्य वाचनातून आपला आत्मविश्वास वाढतो व आपण कोणतेही काम आत्मविश्वासाने पुर्णत्वास नेऊ शकतो.आपला समाज मोठ्या प्रमाणात आहे. मात्र समाजामध्ये आजही अज्ञान व अल्पशिक्षण असल्याने आपला समाज मागासलेला आहे या बाबीची दखल घेऊन समाजातील बांधवांनी, तरुण पिढीतील युवकांनी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर विराजमान होऊन आपला विकास करावा व समाजाच्या विकासासाठी परिश्रम घ्यावे. आपल्या तेली समाजात अनेक संत महात्मे होऊन गेले आहेत. मात्र त्यांची आपल्याला माहिती नसल्याने आपण अज्ञानी बनून जगत आहोत. आपल्या तेली समाजातही अनेक संत महात्मे झाली याचा आपल्याला अभिमान असायला हवा व संतांचे कार्य व विचारांनी प्रेरणा घेऊन युवकांनी समोरील वाटचाल करावी व समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष योगिताताई मधुकर भांडेकर (Yogitatai Bhandekar) यांनी केले.
वालसरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात आयोजित संत शिरोमणी श्री जगनाडे महाराज यांच्या जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. जय संताजी स्नेही मंडळ वालसराच्या वतीने येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती कार्यक्रम मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष योगिताताई मधुकर भांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी श्री घनश्याम लाकडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील श्री. भगिरथजी भांडेकर, युवा नेते मधुकर केशवराव भांडेकर, तं.मु.अध्यक्ष श्री लक्ष्मणराव वासेकर, वालसरा ग्रा.पं. च्या माजी सरपंच वनिता वासेकर, श्री. रविंद्रजी ठाकरे, श्री. मनोहरजी दुधबावरे, श्री. उड्डान,  ग्रा. पं. सदस्या शालीनी शेट्टे, श्री. नंदाजी बुरांडे, श्री. देवदास गव्हारे, श्री. आनंदिव कोहळे, श्री. मारोती भांडेकर, श्री. काशिनाथ कोठारे, शिलाताई शामराव भांडेकर, लताताई गुरुदास बुरांडे, श्री. रघुनाथ भांडेकर, श्री. गुरुदास सोमनकर, श्री. किशोर कोहळे, श्री. गजानन सातपुते, श्री. साईनाथ सुखदेव भांडेकर, श्री. विनायक बारसागडे, श्री. राजु शेट्टे, श्री. संदिप सातपुते, श्री. निलेश कोठारे, श्री. साईनाथ रुषीजी भांडेकर, तसेच वालसरा गट ग्रामपंचायत अंतर्गत वालसरा, राजनगट्टा, कुंभारवाही, भिवापुर येथील समस्त तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सर्वप्रथम श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज व विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेला हार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तदनंतर अनेक मान्यवरांनी श्री संत जगनाडे महाराज व त्या काळात होऊन गेलेल्या समाजातील संत महात्मांच्या जीवन कार्यावर व विचारांवर प्रकाश टाकला. यावेळी वालसरा, राजनगट्टा, कुंभारवाही व भिवापूर येथील तेली समाज बांधव व नागरिक,महिला व युवक-युवती, विद्यार्थी तसेच जय संताजी स्नेही मंडळ वालसराचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री. साईनाथ भांडेकर यांनी केले.