सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे आजच्या काळात गरजेचे : खा. अशाेक नेते

30

– निलज येथील सामूहिक विवाह सोहळ्याला खा. अशोक नेते व माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांची उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील निलज येथे श्री गणेश सामाजिक व सांस्कृतिक मंडळाने सामाजिक पंरपरा जोपासत दिंनाक २४ एप्रिल २०२४ रोज बुधवारी कौस्तुंभ जाणी यांचे आवारात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते व माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी उपस्थित राहून नवदांपत्यास शुभाशीर्वाद दिले.

यावेळी खा. नेते यांनी बोलताना म्हणाले, आजच्या काळात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे गरजेचे आहे. विवाह म्हणजे दोन जिव, दोन कुटुंब, दोन परिवार यांना जोडणारा सोहळा म्हणजे पवित्र विवाह आहे.विवाहाध्ये अनेक पैशाची उधळन होते. यात कर्ज करुन विवाह सोहळा केला जातो. अशावेळी अशा सामूहिक विवाह सोहळ्याची समाजाला नितांत अवश्यकता आहे, असे प्रतिपादन या विवाह सोहळ्याप्रसंगी खा. नेते यांनी केले.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष अरुणजी शेंडे,भाजपा जेष्ठ नेते डॉ. बालपांडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई शेंडे, कृ.उ.बा.स.संचालक यशवंत आंबोरकर, युवा मोर्चा जिल्हा सचिव तन्मयजी देशकर, सामाजिक नेते नानाभाऊ तुपट, सुरेखाताई बालपांडे, गोसावी पिलारे, प्रदिप बुराडे, देवराव ढोरे, सचिन बालपांडे तसेच मोठ्या संख्येने विवाह सोहळ्यातील वऱ्हाडी मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.