Home गडचिरोली ताटीकोंडावार यांच्या आंदाेलनाच्या इशाऱ्याने प्राणहिता पोलीस उपमुख्यालय ते मुख्य चौकाचे काम सुरू

ताटीकोंडावार यांच्या आंदाेलनाच्या इशाऱ्याने प्राणहिता पोलीस उपमुख्यालय ते मुख्य चौकाचे काम सुरू

109

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिराेली : अहेरी जवळील प्राणहिता पोलीस उपमुख्यालय ते अहेरी मुख्य चौक या रस्त्याच्या डांबरीकरनाचे उद्घाटन होऊन अनेक महिन्यांच्या काळ लोटला. मात्र संबंधित कंत्राटदाराणे टाकलेली गिट्टी परत उचलली व अद्याप एका साधा खड्डा सुद्धा बुजविला नव्हता आणि रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामही सुरू केले नाही. त्यामुळे येत्या सात दिवसात या रस्त्याचे डांबरीकरण सुरू केले नाही तर अहेरी येथे उपोषणाला बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी प्रसिध्दी पत्रकातुन दिला होता. तसेच अनेकवेळा होणाऱ्या नागरिकांच्या अडचणी, होणारे अपघात ही वस्तुस्थिती जनतेपु़ढे आणली.
अश्यातच सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

संतोष ताटिकोंडावार यांनी अश्या ज्वलंत प्रश्नाचे मुद्दे उचलले असून आलापल्ली ते सिरोंचा महामार्ग क्रमांक 353c चालू होण्यात मोठा सिंहाचा वाटा आहे.
अनेकवेळा आंदोलने करून वस्तुस्तिथी शासनाच्या निदर्शनास आणून दिली व अंमलबजावणी करण्यास भाग पाडले. अनेकदा त्यांनी शासनाचा महसूल बुडू नये या साठीही प्रयत्न केले. त्यामुळे नागरिकांनी सर्वप्रथम सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटिकोंडावार यांचे आभार मानले. अहेरी विधानसभेच्या प्रश्नांना शासनापर्यंत नेणारा आम्हाला दुवा मिळाला व आमच्या अडचणींना समजून मार्ग काढणारा खंबीर व्यक्ती मिळाल्याने खरच आता कुठे तरी प्रशासनाचे झुकते माप नागरिकांकडे दिसायला लागले.

नागरिकांच्या प्रेमामुळेच मला मिळते जनसेवा करण्याची प्रेरणा

मी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या अडचणी शासनासमोर मांडल्या आहे आणि मांडत राहीन. मीही अहेरी विधानसभा क्षेत्राचा असल्यामुळे नागरिकांच्या काय वेदना आहेत मला कळतात. प्राणहिता पोलीस उपमुख्यालय ते मुख्य चौकापर्यंतच्या रस्ता कामाच्या बातमीला प्रसार माध्यमांनी उचलून धरले व वारंवार जनतेच्या निदर्शनास आनून दिले.

संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते कमलापूर (अहेरी)

error: Content is protected !!