आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व बाल रुग्णालयात फळ वाटप व वृक्षारोपण

69

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयामध्ये भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर व तालुक्याच्या वतीने फळ वाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थित भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रमोद जी पिपरे ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे नगर परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकरजी भांडेकर, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविताताई उरकुडे , माजी नगरसेविका सौ. वैष्णवीताई नैताम, लताताई लाटकर, निमाताई उंदीरवाडे, वर्षाताई शडमाके ,अलकाताई पोहनकर, तालुका प्रभारी विलासजी भांडेकर, तालुक्याचे नेते बंडूभाऊ झाडे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सागर कुंभरे, महामंत्री हर्षल गेडाम, शहराचे महामंत्री विनोद देवोजवार, भाजपा पदाधिकारी सोमेश्वर धकाते, निखिल चरडे, विवेक बैस, कोमलताई बारसागडे , रश्मीताई बघमारे, सेवानिवृत्त प्राध्यापक उराडे सर, यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.