गडचिरोली जिल्ह्यासाठी २० हजार कोटी रुपये मंजूर

67

– शासनाने घेतलेल्या निर्णयाने जिल्ह्यात औद्योगिक क्रांती घडणार : आ. रामदास आंबटकर

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १५ डिसेंबर २०२२ : राज्याच्या शेवटच्या टोकावरील अतिमागास गडचिरोली जिल्ह्यासाठी शासनाने २० हजार कोटी रुपये मंजूर केले आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय जिल्ह्यात औद्योगिक क्रांती घडविण्यासाठी मोलाची मदत होणार आहे. त्याबद्दल या निर्णयाचे विधान परिषद आमदार डॉ. रामदासजी आंबटकर यांनी स्वागत केले आहे.
मंत्रिमंडळाच्या उपसमिती बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांवर २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीस मान्यता दिली आहे. मेसर्स लॉयड मेटल अँड एनर्जी पॉवर या घटकाच्या खनिज उत्खनन व स्टील निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे. या माध्यमातून बेरोजगार युवकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
यापूर्वी राज्यात भाजपा – शिवसेना युती सरकारच्या काळात मा. नितीनजी गडकरी बांधकाम मंत्री असताना राज्यातील रस्ते व पूल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करवून दिला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक खेडेगाव रस्ते व पुलाने जोडल्या गेली. आता सुद्धा शासनाने २० हजार कोटी रुपयांचा निधी जिल्हयातील औद्योगिकीकरणासाठी गुंतवणूक करण्यास मान्यता दिल्याने जिल्ह्यात औद्योगिक क्रांती घडण्यास मोठी मदत होणार आहे. या माद्यमातून जिल्हयाच्या विकासाला मालाचा हातभार लागणार आहे. भाजपा सरकारने आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन कोट्यवधींचा निधी विकासकामांवर मंजूर केला आहे. ग्रामीण भागांचा व शेवटच्या नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे व त्यादृटीने निधीला सुद्धा मान्यता दिली आहे. आता सुद्धा २० हजार कोटी रूपये औद्योगिकीकरणावर गुंतविण्यास मान्यता दिल्याने जिल्ह्यात अनेक नवनवीन उद्योग उभारण्यात येतील. त्या माध्यमातून बेरोजगार युवकांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा विश्वासही आमदार डॉ. रामदासजी आंबटकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केला आहे.