वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांचे डिजिटल ऑनलाईन सातबारे उतारे करून तात्काळ धान्य खरेदी सुरू करा

68

– वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १५ डिसेंबर २०२२ : कुरखेडा तालुक्यातील चार हजार चारशे पंच्यनव 4495 वन हक्क पट्टेधारक शेतकरी बांधव धान्य विक्रीपासून वंचित राहत असल्याने वन हक्क पट्टेधारक शेतकरी आर्थिक संकटात सापडला चित्र निर्माण झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे ७/१२ सातबारे उतारे ऑनलाईन करून वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांचे धान्य खरेदी तात्काळ सुरू करावी, अशी मागणी कुरखेड्याचे तहसीलदार सोमनाथ माळी व आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी बावणे यांच्याकडे करण्यात आली आहे.

येत्या सात दिवसात जर शेतकऱ्यांचे वन हक्क पट्ट्याचे सातबारे यांच्यावर धान्य न घेतल्यास मोठा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुद्धा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या वतिने देण्यात आला आहे. कुरखेडा तालुक्यातील वन हक्क पट्टे धारक, छोटे अल्पभूधारक शेतकरी बांधव धान्य विक्रीपासून वंचित राहिल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे एकीकडे त्याच वनपट्टे सातबारावर शासन सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे. परंतु धान्य विक्री करण्याकरिता सातबारे ऑनलाइन न झाल्याने त्यांचे नोंदणी होत नसुन धान्य खरेदी केल्या जात नाही त्यामुळे संबंधित शेतकरी बांधव हे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये यांच्याकडे सांगितल्यानंतर चांगदेवा फाये नाजुक पुराम यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सोमनाथ माळी यांच्या सोबत चर्चा करुन तात्काळ वन हक्का च्या सातबारा वर शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्यात यावे या संदर्भात चर्चा करुन निवेदन दिले. यावेळी आविमचे व्यवस्थापक बावणे उपस्थित होते.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, भाजपा तालुका अध्यक्ष नाजुक पूराम, यांच्यासह भाजयूमो तालुका अध्यक्ष विनोद नागपूरकर, शेतकरी रवीभाऊ सोनकुसरे, सदानंद हलामी, ऋषि सोनकुसरे, दामोधर वट्टी, पुष्पराज राहांगडाले व शेतकरी उपस्थित होते.