घोट तालुका संघर्ष समितीच्या आंदोलनाला आपले पूर्ण समर्थन : आमदार डॉ. देवरावजी होळी

69

– घोट येथील एकदिवसीय उपोषण आंदोलनाला आमदार डॉ. देवरावजी होळी यांची भेट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १४ डिसेंबर २०२२ : घोट तालुका चामोर्शी विदर्भ आंदोलन समिती व घोट तालुका संघर्ष समिती यांच्या वतीने घोट तालुक्याच्या निर्मितीसह विविध मागण्यांसाठी एक दिवसीय उपोषण आंदोलन केले असता या उपोषण मंडपाला आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी भेट देवून आपले समर्थन जाहीर केले.
यावेळी सरपंच दुधबावरे, समितीचे पदाधिकारी अशोकजी पोरेड्डीवार यांचेसह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपोषणकर्त्यांना मार्गदर्शन करताना मी आपल्या पाठीशी असून आपल्या आंदोलनाला माझे पूर्ण समर्थन असल्याचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आश्वासित केले.