जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या ४७ जाती उपजातींच्या कल्याणासाठी झटणार : आमदार डॉ. देवरावजी होळी

76

– क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा व कै. बाबुरावजी मडावी यांच्या जयंती कार्यक्रमाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली /२८ नोव्हेंबर २०२२ : आदिवासी समाजातील सर्व जाती उपजातींनी मिळून काम करण्याची आवश्यकता असून आपण या विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून आपल्या जिल्ह्यातील आदिवासी समाजातील ४७ जाती उपजातींच्या विकासासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा व कै. बाबुरावजी मडावी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

कै. बाबुरावजी मडावी स्मारक समिती गडचिरोलीच्या वतीने आयोजित या जयंती कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, गडचिरोली जिल्ह्याचे काँग्रेसचे प्रभारी डॉ. नामदेवजी किरसान, सिनेट सदस्य डॉ. सतीश कन्नाके, माजी नगरसेवक गुलाबराव मडावी, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती मीनाताई कोडापे, माजी नगरसेविका रंजनाताई गेडाम, माजी नगरसेविका संध्याताई उईके, प्रकाश मडावी, प्रकाश मडावी, माधवराव गावड, सदानंद ताराम, शालीकराव मानकर, झनकलाल मंगर, कैलासजी मडावी, सुरेश किरंगे, प्रास्ताविक अमरसिंग गेडाम, निशाय येरमे, अन्नपूर्णा मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.

आदिवासी समाजाने आपसातील भेद संपविण्याची गरज आहे. संपूर्ण समाजाने एक होण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी ते म्हणाले. या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आदिवासी समाजाच्या सर्व जाती उपजातीसाठी आपण आजपर्यंत कार्य करीत आलो असून यापुढेही या समाजाच्या कल्याणासाठी पूर्ण ताकतीनिशी झटणार असल्याचे ते म्हणाले.