Home गडचिरोली पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी : आमदार डॉ. देवरावजी होळी

पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी : आमदार डॉ. देवरावजी होळी

165

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रमूख उपस्थितीत चामोर्शी तालुका शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली /२८ नोव्हेंबर २०२२ : पक्षाने सोपवीलेल्या कामांचे नियोजन व आयोजन करून सोपवलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी, असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी चामोर्शी तालुक्यातील शक्ती केंद्रप्रमुखांच्या बैठकीत उपस्थित शक्ती केंद्रप्रमुखांना मार्गदर्शन करताना केले. आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयाच्या सभागृहामध्ये सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीला भाजपा जिल्हा महामंत्री संघटन रवींद्रजी ओल्लारवार, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती तथा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे, तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, तालुका महामंत्री साईनाथजी  बुरांडे, बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष श्री सुरेशजी शहा यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व शक्ती केंद्रप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी बैठकीत उपस्थित शक्ती केंद्रप्रमुखांना पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडून आपले कार्य पुर्ण करावे, असे आवाहन केले.

error: Content is protected !!