महागाव (बूज) येथे नवीन ग्रामपंचायत भवनाचे थाटात लोकार्पण

73

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली / २८ नोव्हेंबर २०२२ : पंचायत समिती अहेरी अंतर्गत येत असलेल्या महागाव (बूज.) येथे नवीन ग्रामपंचायत भवनाचे थाटात लोकार्पण श्री. शंकर एन. झाडे, श्री. नारायण गंगाराम अलोणे, श्री. व्येकटी गंगा वेलादी या जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महागाव (बूज.) कु. पुष्पा दुर्गा मडावी सरपंचा, संजय चंद्राजी अलोणे उपसरपंच, विनायक बाबुराव वेलादी सदस्य, लालू रामय्या वेलादी सदस्य, कु. दीपाली चंद्राजी कांबळे सदस्या, सौ. शोभा सुरेश तलांडे सा.स. समिती अध्यक्ष, डॉ. विशाल येर्रावार प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव (बूज.), शंकर पी. कुंभारे, लक्ष्मण चिंतावार, रविभाऊ नेलकुद्री भाजपा तालुका अध्यक्ष अहेरी, महेश अलोणे, अंकित गोगले, सचिन करमे, निखिल रामटेके, राजेश करमे, मल्लेश मिसलवार, मल्लेश रामटेके, व्येकटेश चिंतावार, मनीषा रामटेके, पुष्ममाला ओंडरे, रुपेश अलोणे, नक्षत्रा ओंडरे, बापू आलाम यांच्यासह सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते.