आ. विजय वडेट्टीवार स्वखर्चातून २ कोटींंचे वाहन आणणार

61

– कॅन्सर तपासणी गावागावात व्हावी यासाठी यासाठी प्रयत्नशील

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर/ २८ नोव्हेंबर २०२२ : ग्रामीण भागात भागवत म्हणजे सण उत्सव असतो. सत्य, अहिंसेच्या मार्गाने चालणारा माणूस परिपुर्ण शुध्द असतो. हा विचार पुढे ठेवून श्री विठ्ठल रुक्मिणी पुण्यक्षेत्र देवस्थान, मौजा बेटाळा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवनाथ कथासागर ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. आज सदर भागवत सप्ताहाला उपस्थित राहून आमदार विजय वडेट्टीवार यांनी ज्ञान अमृताचा लाभ घेतला.

आदर्श गाव निर्मितीसाठी, गावात एकोपा निर्माण करण्यासाठी, व्यसनमुक्तीचा संदेश देऊन व्यसनमुक्त तरुण पिढी तयार करण्यासाठी भागवत सप्ताह महत्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्राची ही संतांची भूमी आहे. संत सांगतात की देव देवळात नाही तर माणसात आहे, श्रद्धेत फार मोठी शक्ती आहे. घरातील आईच्या पाया पडुन कामाला निघालो की नक्कीच आपणास यश मिळते. घरातील वृध्दांची विचारपूस करा व मग कामाला लागा हाच संदेश प्रत्येक भागवत सप्ताहात आपणास मिळतो.

 

 

आमदार म्हणून काम करताना जेथे शक्य होईल तेथे माझा योगदान देण्याचा सदैव प्रयत्न मी करतो. दुर्धर आजाराने ग्रस्त माणसाला स्वतःकडून मदत करतो. सेवा करतो. ही शिकवण मला लहानपणी भागवत सप्ताहातून मिळाली. ज्यामुळे मी घडलो आणि ३० वर्षांपासून समाजासाठी कार्य करण्याची जबाबदारी समाज माझ्यावर विश्वासाने टाकत आहे. कॅन्सरग्रस्त कोणताही रुग्ण भेटीला आला तर पूर्ण प्रयत्नाने शक्य ती मदत त्याला व त्याच्या कुटुंबाला करतो. कर्करोगाचे सुरुवातीलाच निदान न झाल्यामुळे अनेक रुग्णांना उपचार मिळत नाही, ज्यामुळे त्यांना जीव गमवावा लागतो. उपचारात विलंब झाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू होणे ही अत्यंत वेदनादायी बाब असते. म्हणून स्व: खर्चातून २ कोटींची कॅन्सर आजाराचे निदान करणारे पूर्ण सुविधायुक्त वाहन मी नागरिकांसाठी आणणार आहे. सदर वाहन गावागावात जाऊन कॅन्सरचे निदान करण्यासाठी आवश्यक सर्व तपासण्या करून पुढील उपचाराचे नियोजन करेल. या प्रकारचा उपक्रम महाराष्ट्रात पहिल्यांदाच होईल. पालकमंत्री पदी असताना ब्रम्हपुरी मतदारसंघातील कामांना भरभरून निधी मी उपलब्ध करून दिला. बेटाळा गावाकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावरील नाल्यावर ९ :५० कोटी रुपयांचा पुल मंजुर केला. लवकरच सदर विकासकामाचे भुमीपुजन करण्यात येणार आहे

यावर्षी माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून १२ डिसेंबर ला माझ्या मतदारसंघातील १ लाख महिला भगिनींना स्वयंपाक करण्यासाठी शेगड्यांचे वितरण मी करणार आहे. यामुळे हातातून बाहेर गेलेल्या महागाईच्या काळात ग्रामीण भागातील माझ्या भगिनींना नक्की दिलासा मिळेल.

कार्यक्रमाला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जि. प. सदस्य स्मिताताई पारधी, माजी पं. स. सदस्य थानेश्वर कायरकर, सरपंच उमेश धोटे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, नगरसेविका लताताई ठाकुर, सरपंच दौलत धोटे, ब्रम्हदेव दिघोरे, पांडुरंग दिघोरे, संजय मिसार, सुरज मेश्राम, प्रकाश खोब्रागडे, अमीत कन्नाके यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.