राज्य महासंघाच्या राज्याध्यक्षपदी उमेशचंद्र चिलबुले यांची सलग पाचव्यांदा अविरोध निवड

193

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली/ २९ नोव्हेंबर २०२२ : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे 14 वे राज्यव्यापी महाअधिवेशन र. ग. कर्णिक नगर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम औरंगाबाद रोड तपोवन नाशिक येथे नुकतेच संपन्न झाले. मा. कॉ. श्री. सुभाषजी लांबा, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ व मा. उमेशचंद्र चुलबुले यांच्या हस्ते AISGEF व MSZPECF ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मा. श्री. अशोक दगडे अध्यक्ष, मा. श्री. विश्वासजी काटकर सरचिटणीस, मा. श्री. अविनाशजी दौंड कार्यालयीन सचिव महाराष्टृ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, मा. श्री. चंद्रहासजी सुटे अध्यक्ष पेन्शन असोसिएशन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. महासंघास संलग्न प्रवर्ग संघटनेचे राज्याचे अध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी मंडळ, महासंघाचे जिल्हाध्यक्ष, जिल्हासचिव व सर्व पदाधिकारी मंडळ, आमसभेचे सर्व सभासद प्रतिनिधी महिला भगिनी यांची लक्षणीय उपस्थिती होती.
ध्वजारोहनापूर्वी संघटनेच्या घोषणेनी परिसरात नवचैतन्य निर्माण झाले. ध्वजारोहण झाल्यानंतर मा. श्री. अविनाश दौड कार्यालयीन सचिव, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी देशसेवेची प्रतिज्ञा दिली. तदनंतर भव्य रॅली व घोषणांनी परिसरात क्रांतिकारी चैतन्य निर्माण झाले.
सुप्रसिद्ध वादळ वारा फेम श्री. अनिरुद्ध वनकर यांच्या जय जय महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाला शुभेच्छा देण्याकरिता जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री. उन्मेष पाटील, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री  हेमंत गोडसे, नाशिक विभाग पश्चिम मतदार संघाचे आमदार मा. श्रीमती सीमाताई अहिरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे राज्याचे अध्यक्ष मा. श्री. उमेशचंद्र चिलबुले यांनी केले. प्रास्ताविकामध्ये महासंघाच्या स्थापनेबाबत माहिती देताना सांगितले की, 1970 ला राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या संपात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवीला होता. ज्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवीला त्या जिल्ह्याच्या वतीने महासंघाची स्थापना करण्यात आली व पहिले अधिवेशन 1970 ला नाशिक येथेच संपन्न झाले होते. योगायोगाने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त चौदावे अधिवेशन सुद्धा नाशिक येथेच संपन्न होत आहे. गेल्या 52 वर्षात महासंघाच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला व भविष्यातील ध्येय धोरणाचा उहापोह करुन कर्मचारी वर्गाची एकजूट ही काळाची गरज असून एकजुटीशिवाय भविष्यात तरणोपाय नसल्याचे मत आपल्या प्रस्ताविकात व्यक्त केले.
जुनी पेन्शन सर्वांना लागू व्हावी यासाठी जनजागृती सप्ताह म्हणून दिनांक 21 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर  हा कालावधी एन.पी.एस. जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्धार सभागृहामध्ये करण्यात आला. एन.पी. एस. हटाव कृती कार्यक्रमांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान एन. पी. एस.चे दुष्परिणाम यासाठी जनजागृती मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन या महा अधिवेशनाच्या निमित्ताने करण्यात आले.
केंद्र शासनाच्या धोरणाविरुद्ध लढा देण्यासाठी देशात व्यापक एकजूट करण्या करीता दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी तालकटोरा स्टेडियम दिल्ली येथे कन्वेंशन आयोजित करण्यात आलेलं आहे. त्या कन्व्हेन्शनमध्ये सर्वात प्रमुख मागणी जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे एन. पी. एस. चा कायदा केंद्राने रद्द केला पाहिजे याकरिता संपूर्ण देशामध्ये एकजुटीने तीव्र लढा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. या लढ्यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ अग्रेसर राहणार असल्याचे मत उपस्थितांंनी व्यक्त केले.
या राज्यव्यापी अधिवेशनात पुढील पाच वर्षासाठी महासंघाच्या राज्य कायॅकारी मंडळाची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये उत्कृष्ठ संघटन कौशल्य, शांत व संयमी स्वभाव सरकारच्या धोरणाचा अभ्यास, प्रत्येक जिल्ह्यात दांडगा संपर्क साधुन प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सात्यतपूूर्ण केलेला प्रयत्न आणि सरकार आणी प्रशासन यांच्या सोबतचा यशस्वीपणे केलेला संवाद या जोरावर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या राज्याध्यक्ष पदावर श्री. उमेशचंद्र चिलबुले यांची पाचव्यांदा एकमताने अविरोध निवड करुन संपूर्ण कार्यकारी पदाधिकारी मंडळाची निवडणूक अविरोध करण्यात आली. या निवडीमुळे संपूर्ण राज्यात आनंद व्यक्त केल्या जात असून गडचिरोली जिल्हा महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हा समन्वय समितीचे सरचिटणीस रतन शेंडे, सरचिटणीस दुधराम रोहणकर, कार्याध्यक्ष राजकुमार पारधी, उपाध्यक्ष संजय खोकले, गडचिरोली जिल्हा समन्वय समितीचे निमंत्रक तथा राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल चडगुलवार, सरचिटणीस भास्कर मेश्राम, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लतिफ पठाण, सचिव किशोर सोनटक्के, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर, सरचिटणीस दामोधर पटले, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, जिल्हा परिषद लिपीक संघटनेचे सचिव फिरोज लांजेवार, अखिल श्रीरामवार, जिल्हा परिषद महिला कर्मचारी समितीच्या अध्यक्ष कविता साळवे, सचिव मायाताई बाळराजे, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार, विस्तार अधिकारी (पंचायत) संघटनेचे अध्यक्ष बबलु आत्राम, सचिव ज्ञानेश्वर भोगे, अंगणवाडी पयर्यवेक्षिका संघटनेच्या अध्यक्षा मंगला बिरनवार, पशु व्यवसाय संघटनेचे गणपत काटवे, कराड, नर्सेस संघटनेच्या छाया मानकर, फार्मासिस संघटनेचे अध्यक्ष विवेक मून, श्रीकृष्ण मंगर, श्रीमती पारसे, वंदना ठाकरे, राजू रेचनकर, दिलीप कन्नावार, सुनिल वाघमारे, लक्ष्मण अनल, गजानन ठाकरे आदींनी अभिनंदन करुन संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.