सुरजागड ट्रक अपघातातील मृतक अंजली सुभाष जयधर यांच्या घरी राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांनी दिली सांत्वनपर भेट

59

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागील काही दिवसांपूर्वी सुरजागड लोह प्रकल्पाच्या ट्रकने शांतिग्रामजवळ झालेल्या अपघातात मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर येतील अंजली सुभाष जयधर या बंगाली समाजाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी सुरजागड लोह प्रकल्पाची वाहतूक करणाऱ्या तब्बल १० ट्रकांची जाडपोळ केली होती. त्यानंंतर गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी स्वतः कांचनपूर येथील जयधर कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी सदर दुःखद प्रसंगी राजे महाराजांंनी कुटूंबियांना धीर देत त्यांना आर्थिक मदत केली.                                          यावेळी राजेंसमोर मृतकाचे पती सुभाष जयधर यांनी आपल्या भावनेची वाट मोकळी करीत सुरजागड कंपनीवर अनेक गंभीर आरोप केले. इतकी मोठी घटना घडल्यावरही ट्रक वाहतूक थांबविली नाही. मृतदेह पोस्टमार्टेम करून गडचिरोलीवरून रात्री घरी परत येताना ही ट्रक वाहतूक चालूच होती. उलट रात्री २ वाजता कंपनीचे २ मध्यस्थ घरी येऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत होते. ५ लाख रुपये नगदी तथा २ मुलांना सुरजागड प्रकल्पात नोकरी देण्याचे आमिष दाखवून हे प्रकरण शांत करण्यासाठी दबाव टाकण्यात आले. परंतु ही घटना होऊन २० दिवस उलटले तरी अद्यापही मुलांच्या नोकरीसाठी साधे कागदपत्रेही सुरजागड कंपनीने घेतले नाही. आमची फसवणूक होहू देऊ नका, आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी यावेळी जयधर कुटुंबियांनी राजे साहेबांकडे केली.