राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी केले नवनिर्वाचित सरपंच व सदस्याचे अभिनंदन

90

– पुष्पगुच्छ अर्पण करून दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच शारदा पोच्या कोरेत व ग्रामपंचायत सदस्य सिताराम रामपुरी राना यांचे माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांनी राजवाड्यात आज, मंगळवारी सायंकाळी पुष्पहार अर्पण करून व पेढे भरवून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी रमेश पोच्या कोरेत, राजू नानय्या येगलोपवार, शारदाताई येगलोपवार, हेमराज भोवते, महेश येरोजवार आदी उपस्थित होते.