गडचिरोली जिल्ह्यातील भौतिक सुविधा व इतर विकासात्मक ग्रामविकासमंत्री यांच्याशी मुद्यावर सकारात्मक चर्चा

95

– ग्रामीण भागातील विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी! : नगरसेवक आशीष पिपरे

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली मंत्रालय मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे वरीष्ठ नेते व विद्यमान ग्रामविकासमंत्री आदरणीय नामदार श्री गिरीशजी महाजन यांची त्यांच्या मंत्रालयातील विशेष दालनात भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री नगरसेवक आशिषभाऊ पिपरे यांनी सदीच्छा भेट घेतली व गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्थिती, भौतिक सुविधा व करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा केली. दुर्लक्षित भागातील व आपल्या कार्यकर्त्यांची अतिआवश्यक कामे मला सूचवा मी माझ्या स्तरावर तात्काळ मंजूर करुन निधी उपलब्ध करून देतो, असे आश्वासन आदरणीय मंत्रीमहोदय यांनी दिले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या समस्त कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे गडचिरोली जिल्हा भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जाहीर आभार मानले. यावेळी भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष दीपक सातपुते, सोशल मीडिया संयोजक रमेश अधिकारी व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.