गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींंना 27 टक्के आरक्षण द्या : भाजपा नगरसेवक आशिष पिपरे यांची ओबीसी कल्याण व सहकार मंत्री नामदार अतुलजी सावे यांच्याकडे केली मागणी

97

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा नावालाच आदिवासी जिल्हा आहे. मात्र या जिल्ह्यात गैरआदिवासींची लोकसंख्या 62 टक्के आहे. त्यात 90 टक्के लोक ओ.बी.सी आहेत. या अगोदर जिल्हात ओ.बी.सी. ना आरक्षण होते. पण महाविकास आघाडी काळात जिल्ह्यातील आदीवासी समाजाची लोकसंख्या ही 38 टक्के असतांनाच काही आदीवासी लोकप्रतिनिधीनी चुकीचा अहवाल तयार करून आदीवासींची लोकसंख्या जानुन बुजुन 50 टक्के च्या वर दाखवून जिल्ह्यातील ओ. बी. सी. आरक्षण संपविले. हा ओ.बी.सी. समाजावर झालेला खूप मोठा अन्याय आहे. यामुळे ओ.बी.सी. समाजात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे तात्काळ नवीन अहवाल तयार करुन ओ. बी. सी. आरक्षण पुर्ववत करावे, अशी मागणी जिल्ह्यातील समस्त ओ. बी. सी. समाजाच्या वतीने भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री नगरसेवक आशिष पिपरे यांनी मंत्री महोदय यांची भेट घेतली व भाजपा मुंबई येथे ओबीसी आघाडी महाराष्ट्र राज्यच्या वतीने आयोजित ओबीसी आघाडी बैठकीत सदर मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दीपक सातपुते, सोशल मीडिया संयोजक रमेश अधिकारी व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.