विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा महामंत्री योगीताताई प्रमोदराव पिपरे यांचा वाढदिवस मंगळवार, 8 जुलै 2025 रोजी गडचिरोली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
योगिताताई प्रमोदराव पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरात “एक पेड मॉ के नाम” वृक्षारोपन कार्यक्रम, ‘माणुसकीचा घास’ उपक्रमाअंतर्गत अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर शासकिय विश्रामगृह इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे अभिष्टचिंतन सोहळा घेण्यात आला आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी योगिताताई पिपरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा. डॉ. अशोकजी नेते, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, भाजपा लोकसभा समन्वयक तथा गडचिरोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक इंजि. प्रमोदराव पिपरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, नगरसेवक आशिष पिपरे, विवेक बैस, देवाजी लाटकर, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, पुनम हेमके, सुनिता मडावी, शिल्पा लाटकर, अर्चना चन्नावार, बच्चन, श्याम वाढई, विनोद देवोजवार, सलीम शेख, उराडे यांच्यासह महिला आघाडीच्या नेत्या, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





