खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते पाथरी येथे वृक्षारोपण

67

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : मान. खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना खा. नेते म्हणाले, देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा पंधरवडा कार्यक्रम सेवा सप्ताह म्हणून आयोजित करावा. तसेच देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध असून देशातील गोर-गरीब, शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे व्रत हाती घेतले आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी खा.अशोकजी नेते यांनी केले.

वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने मान. सुधीरभाऊ मुनगंटीवार वनेमंत्री होते. त्यावेळी 33 कोटी वृक्ष लागवड करून महाराष्ट्र राज्याचा गौरव म्हणून कार्य केले. वृक्ष लागवड करणे ही एक काळाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने एक तरी वृक्ष लावला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते याप्रसंगी सुद्धा केले.

भारतीय जनता पार्टी तालुका सावली शाखा पाथरीच्या वतीने वृक्षारोपण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी खा. अशोकजी नेते यांनी ग्रामपंचायत कार्यालय पाथरी येथे आढावा घेऊन जनतेच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या. या आढावा कार्यक्रमाचे संचालन व प्रस्ताविक तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांनी केले. याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी व आरोग्य विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी खा. अशोकजी नेते गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे अविनाश पाल, महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोमावार, महामंत्री दिलीप ठिकरे, कोषाध्यक्ष अर्जुनजी भोयर, ज्येष्ठ नेते प्रकाश पा. गड्डमवार, ठाणेदार मोहोर, सरपंच सौ. अनिता ठिकरे, उपसरपंच प्रफुलजी तुम्हे, प्रविण वाघमारे ग्रा. पं. सदस्य, सरपंच गुरु मिसार, सौ. अल्काताई वाघमारे ग्रा.पं. सदस्या, सौ. प्रीतीताई लाडे ग्रा. पं. सदस्या, दिलीप करकाडे, शरद सोनवाणे, निखिल सुरमवार, लोकनाथ रायपुरे, नितिनजी अढिया, दीपक रामटेके, विश्वनाथजी येरणे, तसेच भाजपाचे पदाधिकारी व अनेक महिला वर्ग व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.