भव्य बास्केटबॉल स्पर्धा प्रतियोगिता समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी खा. अशोकजी नेते यांची उपस्थिती

71

– संमिश्र क्रीडा मंडळ ब्रह्मपुरीच्या वतीने स्वर्गीय प्रा. प्रकाश आयदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्पर्धा आयोजित

विदर्भ क्रांती न्यूज

ब्रम्हपुरी : संमिश्र क्रीडा मंडळ ब्रह्मपुरीच्या वतीने स्वर्गीय प्रा. प्रकाश आयदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ बास्केटबॉल प्रतियोगिता स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी बोलताना खा. अशोकजी नेते यांनी बॉस्केटबाल ही स्पर्धा संमिश्र क्रीडा मंडळ ब्रह्मपुरी येथे यांनी ही परंपरा ३७ वर्षांंपासून चालू आहे. ही परंपरा टिकवणे या मंडळावर अवलंबून आहे. अशा या स्पर्धेमुळे युवकांना उत्साह, आनंद मिळतो. खेळामुळे व्यायाम होते. युवकांचे आरोग्य हेल्थ चांगले राहते. अशा बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यावेळी खा. अशोकजी नेते यांनी केले.

तसेच प्रास्ताविक मार्गदर्शन करताना प्रा. अतुलभाऊ देशकर यांनी बास्केटबॉल या स्पर्धेची सुरुवात स्व. जायदे व जगनाडे यांनी केली. त्यामुळे भविष्यात सुद्धा संमिश्र क्रीडा मंडळानी स्वर्गीय प्रा. प्रकाश आयदे यांच्या स्मृती जिवंत व कायम ठेवून ही स्पर्धा निरंतर याच नावाने चालवावी, असे प्रतिपादन बास्केटबॉल स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी केले.

याप्रसंगी खा. अशोकजी नेते. गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, मा. आ. डॉ. रामदासजी आंबटकर विधान परिषद सदस्य, प्रा. अतुलभाऊ देशकर माजी आमदार ब्रम्हपुरी, प्रा. उमेश मिश्रा उपाध्यक्ष, शत्रुघ्न गोखले, अशोक पटले, डॉ. वंजारी, डॉ. अतुल नागरे, प्राचार्य अश्विन चंडेल, अतुल गौरशेट्टीवार, प्राचार्य देविदास जगनाडे, दत्ताजी कात्यायन अर्बन को -ऑ.बँक ब्रम्हपुरी, नितीन उराडे, सी‌. पी‌.जेम्स सचिव सं. क्री. मंडळ, प्रा. दिलीप जगनाडे, अमित मेंडुले,
प्रा. संजय लांबेे, मनोज वट्टे, डॉ. यादव लंजे, तसेच संमिश्र मंडळाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.