आमदार डॉ. देवराव होळी यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांंनी साजरा

86

– घरकूल लाभार्थ्यांना केले चावीचे वितरण व विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप आणि वृक्षारोपण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांचा वाढदिवस 10 डिसेंबर रोजी गडचिरोली पंचायत समिती येथे विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम येथील पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समितीच्या वतीने आमदार डॉ. देवराव होळी यांचा पंचायत समितीचे सभापती मारोतराव ईचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, संवर्ग विकास अधिकारी मुकेश मोहर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच घरकूल लाभार्थ्यांना चावीचे वितरण, बाल कल्याण विभागाच्या लाभार्थ्यांना मशरुम, वाहनचालक यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती मारोतरराव ईचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, भाजपा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समितीचे सदस्य रामरतन गोहणे, पंचायत समिती सदस्य नेताजी गावतुरे, शंकर नैताम, दुर्लभाताई बांबोळे, जानव्ही भोयर, भाजपचे जेष्ठ नेते विलास पा. भांडेकर, भाजपाचे तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे आदींची उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक व पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन यु. एन. राऊत यांनी केले तर आभार बारई यांनी मानले.