आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली नगर परिषदेत वृक्षारोपण

77

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वाढदिवसानिमित्त 10 डिसेंबर रोजी गडचिरोली येथील नगर परिषद परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, भाजपा नेते सुधाकर यनगंदलवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, आयटी सेल जिल्हाध्यक्ष अविनाश महाजन, जिल्हा परिषद सभापती रंजिताताई कोडाप, प्रतिभाताई चौधरी, प्रकाश गेडाम, जनार्धन साखरे, दत्तू माकोडे, अनिल करपे, बंडू झाडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.