संत निरंकारी मंडळाद्वारे आज देसाईगंज (वडसा) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

71

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक संत निरंकारी मंडळाच्या शाखेद्वारे 10 जून 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत देसाईगंज (वडसा) येथील आरमोरी मार्गावरील संत निरंकारी सत्संग भवनात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सद् गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या प्रेरणेने जिल्ह्यातील सर्वसाधारण गोरगरीब रुग्णांना रक्त टंचाई होऊ नये म्हणून जिल्हा रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय गडचिरोली यांच्या विनंतीनुसार संत निरंकारी मंडळाद्वारे जिल्ह्यात विविध ठिकाणी स्थानिय शाखेद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करुन मानव सेवेचे कार्य केले जाते. यावर्षी 24 एप्रिल 2022 रोजी महिला रुग्णालय गडचिरोली येथे मंडळाद्वारे रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. त्यात 50 लोकांनी रक्तदान केले होते. यापुढे कुरखेडा, मालेवाडा, चामोर्शी व आष्टी या मंडळाच्या शाखेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन नियोजित केलेले आहे.
मागील दोन वर्षांत कोविड महामारीच्या काळातही मंडळाद्वारे प्रशासनाच्या विनंतीवरुन देसाईगंज येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करुन अनुक्रमे 160व 130 युनीट रक्त शासकीय जिल्हा रुग्णालयाला पुरवठा केला होता. यावर्षीही देसाईगंज (वडसा) येथील रक्तदान शिबिरात परिसरातील भाविक व नागरिक मोठ्या संख्येने रक्तदान करणार आहेत. जवळपास 200- 250 महिला-पुरूष रक्तदान करतील, अशी अपेक्षा संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज श्री. किसन नागदेवे यांनी व्यक्त केली आहे. जनजागृतीसाठी बुधवार, 8 जूनला संत निरंकारी सेवादलद्वारे जनजागृती रॅली संपूर्ण शहर परिसरात काढण्यात आली होती. त्यात जवळपास 100 महिला- पुरुष सेवादल यांनी गणवेशात सहभाग घेतला. सर्व मानवप्रेमी जनतेने रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्तदानाचे महान कार्य करावे, अशी विनंती संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज श्री. किसन नागदेवे यांनी केली आहे.