विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : स्थानिक राणी दुर्गावती कन्या विद्यालय व कला कनिष्ठ महाविद्यालयाचा एच. एस. सी. (इयत्ता बारावी) परीक्षेचा निकाल 9 जूून 2022 रोजी ऑनलाईन जाहीर झाला असून यावर्षी देखील विद्यार्थिनींनी यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी एच. एस. सी बोर्ड परीक्षेला एकूण 45 विद्यार्थीनी प्रविष्ठ झालेल्या होत्या. त्यापैकी 43 विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. सदर परीक्षेत तीन विद्यार्थिनी अनुक्रमे प्रेमनंदा गडपायले (७६.३३ टक्के) कुमारी चांदणी डुरके (७५.३३टक्के) व कु. साक्षी
जेंगठे (७६ टक्के) गुण प्राप्त करून विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. प्रथम श्रेणीत 38 विद्यार्थिनी तर द्वितीय श्रेणीत ०२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थिनींचे व त्यांच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष व आदिवासी सेवक मा. घनश्यामजी मडावी, शाळेच्या प्राचार्य श्रीमती वैशाली मडावी, पर्यवेक्षक श्री पुरुषोत्तम ठाकरे, प्राध्यापिका संध्या येलेकर, शाळेचे शिक्षक श्री संजय दौरेवार, प्रा. पी. एन. ठाकरे, प्रा. डी. आर. कांमडी, प्रा. पि. डी. सोनवाने, श्री. एन. एस. ढोढरे यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.