धान खरेदीची मर्यादा वाढवा : विदर्भातील आमदारांची केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल यांच्याकडे एकमुखी मागणी

164

– विदर्भातील आमदारांनी केंद्रिय मंत्री पियूषजी गोयल यांची भेट घेऊन खरेदी मर्यादा वाढविण्यासाठी केली विनंती

– धान खरेदीची मर्यादा वाढविण्यासंदर्भात राज्य सरकार उदासीन असल्याचा आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा गंभीर आरोप

– केन्द्र सरकारच्या नावावर राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक

– धान खरेदीची मर्यादा वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीतून राज्य सरकारचा खोटारडेपणा उघड

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्यातील ठाकरे सरकार धान खरेदीची मर्यादा वाढविण्यासंदर्भात राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करीत असून खरेदीची मर्यादा वाढविण्यासंदर्भात केलेल्या केंद्र सरकारच्या पत्रव्यवहारातून ही बाब उघड झाल्याचा आरोप आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केला आहे . त्यामुळे केंद्र सरकारने यात लक्ष देऊन धान खरेदीची मर्यादा वाढवावी, अशी एकमुखी मागणी भारतीय जनता पार्टीच्या विदर्भातील आमदार खासदारांनी केंद्रीय मंत्री पियूषजी गोयल यांची मुंबई येथे भेट घेऊन केली.

यावेळी माजी मंत्री प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे, आमदार बंटीभाऊ भांगडीया, आमदार डॉ. देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे, आमदार विजय रहांगडाले, आमदार टेकचंद सावरकर, यांच्यासह विदर्भातील भाजपा आमदार प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यातील उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार भ्रष्टाचार व घोटाळ्यात गुंतलेले असून राज्यातील शेतकऱ्यांशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. मागील अनेक दिवसांपासून विदर्भातील आमदार धान खरेदीची मर्यादा वाढविण्यासंदर्भात राज्य सरकारशी पत्रव्यवहार करीत आहेत. मात्र याबाबत ठाकरे सरकारने मागणी संदर्भात केलेला खोटारडे पणा उघड झाला असून खरेदी मर्यादेत किंचित वाढ करून राज्यातील शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामूळे यात केन्द्र सरकारने जातीने लक्ष देऊन धान खरेदीची मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी यावेळी उपस्थित सर्व आमदारांनी केली.