आष्टी- आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाची मान्सूनपूर्व दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा आंदोलन करणार : महेंद्र ब्राम्हणवाडे

65

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सुरजागड प्रकल्प सुरू झाल्याने आष्टी- आलापल्ली- सिरोंचा महामार्गावर मोठया प्रमाणात मालवाहक चारचाकी गाड्याची आवक जावक वाढली आहे. बरेच वेळा ह्या मालवाहक गाड्या क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेतात. त्यामुळे सदर महामार्गाची दुरावस्था झाली असून ह्याचा सर्व नागरिकांस त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना शारीरिक त्रासही सहन करावा लागत असून, रस्त्यावर दुर्घटनेचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे व अनेकांना शारीरिक इजा सहन कराव्या लागत आहे काहींना जीवही गमवावा लागत आहे. मात्र या संपूर्ण घडामोडी कडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्णपणे डोळेझाक पणा केलेला असून याकडे त्वरित लक्ष देऊन लवकरात लवकर मान्सूनपूर्व रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी व क्षमतेपेक्षा मालवाहुन नेणाऱ्या गाड्यांवर अंकुश लावण्यात यावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे. अन्यथा जिल्हा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ब्राम्हणवाडे यांनी दिला आहे.