प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात होणार विविध सामाजिक उपक्रम : जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची माहिती

62

– 15 हजार नोटबुक वाटप, रक्तदान, आरोग्य तपासणी, वृक्षरोपण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यातील पक्ष संघटन मजबूत करण्याच्या अनुषंगाने जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व सेल चे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक पार पडली. उपस्थित सर्व सेल अध्यक्षांना सेलची जिल्हा कार्यकारणी गठीत करणे व सेलच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी सूचना केल्या. सोबतच प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात 15 हजार शालेय नोट बुक वाटप कार्यक्रम, रक्तदान, आरोग्य तपासणी शिबीर, वृक्षारोपण सारख्या विविध सामाजिक उपक्रम घेण्याच्या सूचनाही दिल्या.
यावेळी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. चंदा कोडवते, शहर अध्यक्ष सतिश विधाते, महिला जिल्हाध्यक्ष रुपालिताई पंदिलवार, शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष देवाजी सोनटक्के, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, अनुसुचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, महिला अध्यक्ष अपर्णा खेवले, किसान सेल अध्यक्ष वामनराव सवसाकडे, स्वयंरोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, व्ही.जे.ऐन. टी. सेल अध्यक्ष विनोद चव्हाण, शामराव चापले, जिल्हा काँग्रेस सचिव तथा निवडणूक सल्लागार सुनील चडगुलवार, एटापल्ली ता. अध्यक्ष संजय चरडूके, काँग्रेस नेते नंदू नरोटे, प्रभाकरजी कुबडे, बाबुराव गडसूलवार, सुधीर बांबोळे, निशा आयतुलवार, कल्पना नंदेश्वर, सह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.