विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अखील भारतीय काँग्रेस कमिटीच्या, उदयपूर नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने 1 व 2 जून 2022 रोजी शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली “नवसंकल्प कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्याचे सर्व काँग्रेसचे मंत्री, आमदार, प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदी उपस्थित राहणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे सह जिल्ह्यातील सर्व नेते, प्रदेश पदाधिकारीही यावेळी उपस्थित राहणार आहे.
या नवसंकल्प शिबिरात संघटन गट, राजकीय गट, आर्थिक गट, शेतकरी आणि शेतमजूर गट, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण गट सोबतच युवक आणि महिला सक्षमीकरण गट असे विविध समित्या तयार करण्यात आल्या असून त्या माध्यमातून काँग्रेसला अधिक मजबूत करण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार आहे.
जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची युवक आणि महिला सक्षमीकरण समितीमध्ये निवड झाली असून, युवक आणि महिला सक्षमीकरणाच्या संदर्भाने पक्षाचे ध्येय अधिक मजबूत करण्या करता, अधिकाधिक युवकांना पक्षात संधी देेण्याकरिता, सोबतच रोजगार निर्मितीच्या संदर्भाने ही युवकांचे प्रश्न आणि त्यावरील उपाय हा विषय या समिती समोर मांडणार व युवक आणि महिलांच्या सक्षमीकरना करिता पूर्ण प्रयत्न करणार, असे महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी सांगितले.