गडचिरोली जिल्ह्यातील कोरोनामुळे अनाथ झालेल्या लाभार्थी बालकांना खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते आर्थिक पॅकेजचे वितरण

136

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कोरोणामुळे अनाथ झालेल्या लाभार्थी बालकांना खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे आर्थिक पॅकेजचे वितरण करण्यात आले.

कोरोना महामारीमध्ये ज्यांचे आई – वडील मृत्युमुखी पडले अशा अनाथ बालकांसोबत प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांची ऑनलाईन परिसंवादमध्ये गडचिरोली जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या लाभार्थी बालकांना जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे आर्थिक पॅकेजचे वितरण करण्यात आले.
केंद्र सरकारच्या महिला बालकल्याण विभागामार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोरोना महामारीमुळे आपले आई-वडील गमावलेल्या मुलांना पीएम केअर फार चिल्ड्रन फंड निधीमधून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार व या मुलांना वयाच्या 23 वर्षापर्यंत मासिक स्टायफंड देण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. याशिवाय आयुष्यमान भारत योजनातुन मुलांना पाच लाख रुपयाचा आरोग्यविमा सुद्धा दिला जाणार आहे. त्याचा प्रिमियम सुद्धा पीएम केअर फंडातून सुद्धा भरला जाणार. तसेच विविध योजनांमधून मुलांना लाभ मिळावा. शिक्षणाची, आरोग्यची व्यवस्थासुद्धा शासन करणार याची संपूर्ण माहिती लाभार्थी परिसंवाद कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आले.
याप्रसंगी खा. अशोकजी नेते, आ. धर्मरावबाबा आत्राम, उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, तसेच अधिकारीवर्ग, अनाथ बालके व बालकाचे नातलगसुद्धा उपस्थित होते.