शिवसेनेच्या दणक्याने चातगाव – रांगी रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

140

– शिवसेना सहसंर्पक प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविदभाऊ कात्रटवार यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातून जाणाऱ्या चातगाव – रांगी या प्रमुख मार्गाची दुरावस्था झाली होती. याबाबत शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. कात्रटवार यांच्या मागणीची दखल घेवून संबंधित विभागाने रांगी – चातगाव रस्त्याचा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. चातगाव-रांगी हा प्रमुख मार्ग असून या मार्गावर दिवसरात्र वाहनाची वर्दळ सुरु असते. या रस्त्याची गेल्या अनेक महिन्यापासून दुुरावस्था झाली होती. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते. त्यामुळे अपघाताच्या धोका वाढला होता. चातगाव-रांगी मार्गावर अनेक गावे आहेत. तसेच हा मार्ग धानोरा – आरमोरीकडे जात असल्याने मोठया प्रमाणात वाहतुक सुरु असते. रस्ता पुर्णपणे उकडून गेला होता. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. तसेच या मार्गावर अनेक छोटे मोठे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी मुरमाडी – मौशीखांब जिल्हा परिषद क्षेत्रातील शिवसैनिकांनी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविदभाऊ कात्रटवार यांच्याकड़े केली होती. अरविदभाऊ कात्रटवार यांनी रांगी-चातगाव रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला होता. रस्त्याची गंभीर समस्या तातडीने न सोडविल्यास शिवसेनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता. शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा धसका घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने रांगी-चातगाव रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविदभाऊ कात्रटवार यांनी रस्ता दुरुस्तीचा कामाला शिवसैनिकांसह भेटू देवून प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार, उपतालुका प्रमुख शिवसेना गडचिरोली यादव लोहंबरे, स्वप्निल खांडरे, राहुल सोरते, संजय शेंडे, निकेश लोहंबरे, मोतीराम भुरसे, निरंजन लोहंबरे, नेपाल लोहंबरे, जगन चापडे, प्रविण मिसार, विनोद मडावी, सुमीत सोनटक्के, सुरेश मडावी, गोपाल मोगरकार, किशोर देशमुख, अरुण चिचोलकार, चरण देशमुख, संदीप भुरसे, संजय चांग, अविनाश झोडे यांच्यासह या भागातील शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.