हनुमान जयंतीनिमित्त खोब्रामेंढा (मालेवाडा) येथे भोजनदान कार्यक्रम

115

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दि. १६/४/२०२२ रोजी हनुमान जयंतीच्या पर्वावर खोब्रामेंढा (मालेवाडा) ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथे आदिवासी विद्यार्थी संघ शाखा कुरखेडा च्या वतीने सरसेनापती नंदुभाऊ नरोटे माजी जि. प. सदस्य यांच्या नेत्रुत्वात भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. एन. डी. किरसान यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदुभाऊ नरोटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जीवन पाटील नाट, माजी जि. प. सदस्य प्रभाकरजी तुलावी, खोब्रामेंढाचे प्रमुख चंदनशाह कल्लो, महसुल कर्मचारी संघटनेचे चंदुभाऊ प्रधान, किशोरभाऊ मेश्राम, तुलसीदासजी बोगा, सरपंच अनुसयाबाई पेंदाम, शेषरावजी कल्लो, कुमेटी, लांजेवार व सहकारी उपस्थित होते. यावेळी भोजनदानाचे उद्घाटन करुन भाविकांना पंगतीत बसवून मान्यवरांच्या हस्ते भोजन वितरण करण्यात आले.