राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी केले अभिवादन

136

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोलीकडून आयोजित राष्ट्रवादी समता सप्ताहात इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय तथा मानवता या तत्वाची शिकवण देणारे युगपुरुष भारतीय घटनेचे शिल्पकार प्रज्ञासूर्य विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोलीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा नगर परिषद गडचिरोलीचे माजी उपाध्यक्ष प्रकाश उध्दवराव ताकसांडे, शहर अध्यक्ष विजय गोरडवार, तालुकाध्यक्ष विवेक बाबनवाडे, जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा सचिव संजय शिंगाडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष इंद्रपाल गेडाम, सामाजिक न्याय विभागाच्या महिला अध्यक्ष प्रमिलाताई रामटेके, माजी नगरसेविका वच्छलाबाई बारसिंगे, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा सरचिटणीस चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली शहर सचिव अमोल कुळमेथे तथा उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.